मेसेज ..
मेसेज हा, मेसेज हा, मेसेज असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!
काय म्हणता? मेसेज हा एक त्रास असतो?
कॉल नाही घेतल्यानंतरचा तो संदेश असतो?
आणि परत मेसेज केल्यावर आपलाच खर्च वाढणार असतो?
असला तर असू दे,
वाढला तर वाढू दे!
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
मेसेज हा, मेसेज हा, मेसेज असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!
मोबाईल न वपारणाऱ्या मंडळींना
मेसेज चे महत्व काय कळणार?
मैत्रिणीची मजा घेण्यासाठी
मेसेज करता येतो,
लेक्चर ला येणार नाही
हे सांगण्यासाठी मेसेज करता येतो;
लेक्चर ला पटकन ये हे
बजावण्यासाठी मेसेज देता येतो;
एवढंच काय, या पुढचं लेक्चर बंक करू हे सांगण्यासाठी
अगदी चालू लेक्चर मध्ये सुद्धा मेसेज करता येतो;
आणि म्हणूनच,
मेसेज हा, मेसेज हा, मेसेज असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!
हातात मोबाईल असला की कधीही मेसेज येऊ शकतो;
न बोलणारा व्यक्ती तोंडाशिवाय बोलू लागतो.
कॉल कितीही केलेत तरी त्यात मेसेज एवढी गम्मत नाही;
मित्राचा सोडा हो, मैत्रिणीच्या मेसेज ची हुरहूर कशातच नाही!
मेसेज चे हे सारे फायदे तुम्हालाही कळले आहेत,
आणि मलासुद्धा म्हणजे कळले आहेत!
कारण,
मेसेज हा, मेसेज हा, मेसेज असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!
मेसेज हा कंटाळवाणा प्रकार असतो,
असं म्हणणारी माणसं भेटतात,
मेसेज म्हणजे दिलदारपणा असतो
असं मानणारी माणसं भेटतात !
मेसेज हा, मेसेज हा, मेसेज असतो,
तुमच्या आणि आमच्या लेखी त्याचा अर्थ वेगळा असतो!!
तिच्यासोबत तुम्ही कधी
मेसेज -मेसेज खेळला असाल!
अभ्यासिकेतून बाहेर ये हे सांगण्यासाठी मेसेज केला असाल
थेअटर जवळ मी आलोय,
हे सांगण्यासाठी मेसेज असतो,
तू अजून कुठे आहेस?
हे विचारण्यासाठी मेसेज असतो!
भेटीनंतर संध्याकाळी सुखरूप घरी पोचलीस का?
हे विचारण्यासाठी मेसेज असतो,
हो पोचले, काळजी करू नकोस
हे सांगण्यासाठी मेसेज असतो!
गुड- नाईट म्हणण्यासाठी मेसेज असतो!,
गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी मेसेज असतो!,
उद्या कॉलेज ला लवकर ये
हे सांगण्यासाठी मेसेज असतो,
तर पाठीमागून तिसऱ्या बेंचवर बस
हे सुचवण्यासाठी मेसेज असतो!
मेसेज ही साथ असते ;
मेसेज ही सोबत असते.

फोन नाही केला तरी मेसेज करता येतो
फोन नाही उचलला तरी मेसेज करता येतो
फोन बदलला तरी मेसेज करता येतो,
आणि सिमकार्ड जरी बदललं तरीसुद्धा मेसेज करता येतो!
आणि म्हणूनच,
मेसेज हा, मेसेज हा, मेसेज असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!!
फोन बदलला तरी मेसेज करता येतो,
आणि सिमकार्ड जरी बदललं तरीसुद्धा मेसेज करता येतो!
आणि म्हणूनच,
मेसेज हा, मेसेज हा, मेसेज असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!!
-शुभम तेलभाते
No comments:
Post a Comment