Wednesday, 17 April 2013

फोन उचल फोन उचल, आता तरी फोन उचल


                        फोन उचल फोन उचल 
                       आता तरी फोन उचल 
काव्य क्षेत्रातील माझे आदर्श कवी मंगेश पाडगावकर यांची मनापासून माफी मागून...
पाडगावकरांची प्रसिद्ध कविता "चिऊताई दार उघड" या कवितेचे विडंबन करण्याचा प्रयत्न केला आहे.

 मोबाईल च्या काळामध्ये होनाऱ्या प्रेमामध्ये आपल्या नाराज प्रेमिकेला पटवण्यासाठी मुलाने केलेली तडजोड लक्षात घेऊन केलेली ही कविता....



फोन उचल फोन उचल
आता तरी फोन उचल
फोन असा बंद करून 
माझ्यावरती रागावून ,
किती वेळ अशी नाराज होऊन बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
फोन तू चालू करायला हवा
माझा कॉल तू उचलायला हवा  !
फोन उचल फोन उचल
आता तरी फोन उचल
मुल जशी असतात,तश्या मुलीही असतात.
सरळ मार्ग असतो,तसे फाटेही असतात !
अश्रू हे दुखातच असतात.
आनंद हे सुखातच असतात.
कधी कधी दुःखच आयुष्यात 
सर्वत्र पसरलेले  असतात .
दुःखाचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या प्रेमाला धक्के बसतील .
तरीसुद्धा या प्रेमात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
फोन उचल फोन उचल 
आता तरी फोन उचल
सगळंच कसं होणार
तुझ्या मनासारखं?आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
बाकीचे वैरी झालेत म्हणून 
आपण का नाराज व्हायचं?
दुसऱ्यांच प्रेम सुंदर आहे म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
प्रत्येकाच्या आत
उमलणार प्रेम असतं.
प्रत्येकाच्या आत
सुंदर आयुष्य असतं !
उमलनाऱ्या फुलासाठी, सुंदर आयुष्यासाठी
फोन उचल फोन उचल 
आता तरी फोन उचल
नाराजीच्या प्रेमामध्ये 
काहीसुद्धा घडत नाही.
आपला मोबाईल बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला 
राग करू लागतो
आपल्याच काळोखाने 
आपलं मन विसरू लागतो..
अग अग
तुला काहीच कळलं नाही .
तुझा मोबाईल बंद होता 
चार्ज असून अंध होता  .
बंद मोबाईल ठेऊन कसं चालेल?
अस माझ्यावरती रुसून कसं चालेल ?
फोन उचल फोन उचल 
आता तरी फोन उचल
शुभम तेलभाते
itsshubhtelbhate@gmail.com
http://us-ads.openx.net/w/1.0/ri?ts=1fHJhaWQ9OTQ3OTg1M2YtNmFiNy00YTY5LTgxMTAtN2M4ZmQ5YTQ4ZThkfHNpZD03ODEzMnx1PTF8YXVpZD0zNTU1MjV8cmlkPTM2MzQ1Zjc3LTk5ZjQtNDEyZi1iMzU0LTJmOTAwMzZiYmE2Y3xwYz1VU0R8cnQ9MTM2NjE4NjAyNnxwdWI9Nzk0OTQ&cb=49181402

No comments:

Post a Comment