Wednesday, 17 April 2013

फोन उचल फोन उचल, आता तरी फोन उचल


                        फोन उचल फोन उचल 
                       आता तरी फोन उचल 
काव्य क्षेत्रातील माझे आदर्श कवी मंगेश पाडगावकर यांची मनापासून माफी मागून...
पाडगावकरांची प्रसिद्ध कविता "चिऊताई दार उघड" या कवितेचे विडंबन करण्याचा प्रयत्न केला आहे.

 मोबाईल च्या काळामध्ये होनाऱ्या प्रेमामध्ये आपल्या नाराज प्रेमिकेला पटवण्यासाठी मुलाने केलेली तडजोड लक्षात घेऊन केलेली ही कविता....



फोन उचल फोन उचल
आता तरी फोन उचल
फोन असा बंद करून 
माझ्यावरती रागावून ,
किती वेळ अशी नाराज होऊन बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
फोन तू चालू करायला हवा
माझा कॉल तू उचलायला हवा  !
फोन उचल फोन उचल
आता तरी फोन उचल
मुल जशी असतात,तश्या मुलीही असतात.
सरळ मार्ग असतो,तसे फाटेही असतात !
अश्रू हे दुखातच असतात.
आनंद हे सुखातच असतात.
कधी कधी दुःखच आयुष्यात 
सर्वत्र पसरलेले  असतात .
दुःखाचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या प्रेमाला धक्के बसतील .
तरीसुद्धा या प्रेमात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
फोन उचल फोन उचल 
आता तरी फोन उचल
सगळंच कसं होणार
तुझ्या मनासारखं?आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
बाकीचे वैरी झालेत म्हणून 
आपण का नाराज व्हायचं?
दुसऱ्यांच प्रेम सुंदर आहे म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
प्रत्येकाच्या आत
उमलणार प्रेम असतं.
प्रत्येकाच्या आत
सुंदर आयुष्य असतं !
उमलनाऱ्या फुलासाठी, सुंदर आयुष्यासाठी
फोन उचल फोन उचल 
आता तरी फोन उचल
नाराजीच्या प्रेमामध्ये 
काहीसुद्धा घडत नाही.
आपला मोबाईल बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला 
राग करू लागतो
आपल्याच काळोखाने 
आपलं मन विसरू लागतो..
अग अग
तुला काहीच कळलं नाही .
तुझा मोबाईल बंद होता 
चार्ज असून अंध होता  .
बंद मोबाईल ठेऊन कसं चालेल?
अस माझ्यावरती रुसून कसं चालेल ?
फोन उचल फोन उचल 
आता तरी फोन उचल
शुभम तेलभाते
itsshubhtelbhate@gmail.com
http://us-ads.openx.net/w/1.0/ri?ts=1fHJhaWQ9OTQ3OTg1M2YtNmFiNy00YTY5LTgxMTAtN2M4ZmQ5YTQ4ZThkfHNpZD03ODEzMnx1PTF8YXVpZD0zNTU1MjV8cmlkPTM2MzQ1Zjc3LTk5ZjQtNDEyZi1iMzU0LTJmOTAwMzZiYmE2Y3xwYz1VU0R8cnQ9MTM2NjE4NjAyNnxwdWI9Nzk0OTQ&cb=49181402

Friday, 12 April 2013

मेसेज ...



 मेसेज ..


मेसेज हा, मेसेज हा, मेसेज  असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!

काय म्हणता? मेसेज  हा एक त्रास असतो?
कॉल नाही घेतल्यानंतरचा तो संदेश असतो?
आणि परत मेसेज केल्यावर आपलाच खर्च वाढणार असतो?

असला तर असू दे,
वाढला तर वाढू दे!

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

मेसेज  हा, मेसेज  हा, मेसेज  असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!


मोबाईल न वपारणाऱ्या मंडळींना
मेसेज चे महत्व काय कळणार?


मैत्रिणीची मजा घेण्यासाठी  
मेसेज करता येतो,

लेक्चर ला येणार नाही  
हे सांगण्यासाठी मेसेज करता येतो;

लेक्चर ला पटकन ये हे
बजावण्यासाठी मेसेज  देता येतो;

एवढंच काय, या पुढचं लेक्चर बंक करू हे सांगण्यासाठी
अगदी चालू लेक्चर मध्ये सुद्धा मेसेज करता येतो;


आणि म्हणूनच,
मेसेज  हा, मेसेज  हा, मेसेज  असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!



हातात मोबाईल असला की कधीही मेसेज येऊ शकतो;
न बोलणारा व्यक्ती तोंडाशिवाय बोलू लागतो.

कॉल कितीही केलेत तरी त्यात मेसेज एवढी गम्मत नाही;
मित्राचा सोडा हो, मैत्रिणीच्या मेसेज ची हुरहूर कशातच नाही!

मेसेज चे हे सारे फायदे तुम्हालाही कळले आहेत,
आणि मलासुद्धा म्हणजे कळले आहेत!

कारण,
मेसेज  हा, मेसेज  हा, मेसेज  असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!


मेसेज हा कंटाळवाणा प्रकार असतो,
असं म्हणणारी माणसं भेटतात,

मेसेज  म्हणजे दिलदारपणा असतो
असं मानणारी माणसं भेटतात ! 

मेसेज  हा, मेसेज  हा, मेसेज  असतो,
तुमच्या आणि आमच्या लेखी त्याचा अर्थ वेगळा असतो!!


तिच्यासोबत तुम्ही कधी
मेसेज -मेसेज  खेळला असाल!
अभ्यासिकेतून बाहेर ये हे सांगण्यासाठी मेसेज केला असाल  

थेअटर जवळ मी आलोय,
हे सांगण्यासाठी मेसेज असतो,
तू अजून कुठे आहेस?
हे विचारण्यासाठी मेसेज असतो!

भेटीनंतर संध्याकाळी सुखरूप घरी पोचलीस का?
हे विचारण्यासाठी मेसेज  असतो,

हो पोचले, काळजी करू नकोस
हे सांगण्यासाठी मेसेज  असतो!

गुड- नाईट म्हणण्यासाठी मेसेज  असतो!,
गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी मेसेज  असतो!,



उद्या कॉलेज ला लवकर ये  
हे सांगण्यासाठी मेसेज असतो,

तर पाठीमागून तिसऱ्या बेंचवर बस
हे सुचवण्यासाठी मेसेज असतो!



मेसेज ही साथ असते
मेसेज ही सोबत असते.
फोन नाही केला तरी मेसेज करता येतो
फोन नाही उचलला तरी मेसेज करता येतो
 
फोन बदलला तरी मेसेज करता येतो,
आणि सिमकार्ड जरी बदललं तरीसुद्धा मेसेज करता येतो!
 
आणि म्हणूनच,

मेसेज  हा, मेसेज  हा, मेसेज  असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!!
                                          
                                
                                       -शुभम तेलभाते 

टोलनाका की लूटनाका?


                                        टोलनाका की लूटनाका?
राष्ट्रीय महामार्गावर दररोज कितीतरी वाहने प्रवास करतात. सध्या सामान्य माणसाला राष्ट्रीय महार्गावरील प्रवास खूपच अवघड व महाग ठरत आहे. आपण बघतो की राष्ट्रीय      
महामार्गावर खूप टोलनाके उभारलेले आहेत. या टोलनाक्याच्या दराने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली जाईल अशी स्थिती निर्माण केली गेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राष्ट्रीय 
महामार्गावर असे टोलनाके आहेत ज्यांच्या रस्ता बांधणीसाठी आलेल्या खर्चाची वसुली पूर्ण झालेली असूनही, त्यापेक्षा अनेकपटीनी पैसा सर्वसामान्य माणसाकडून वसूल केला जात आहे. कारण ह्या टोलनाक्याचे कंत्राटदार दुसरे तिसरे कोणीही नसून बऱ्याचश्या राजकारण्यांचे सगेसोयरेच आहेत. त्यामुळे ह्या भक्कम पाठिंब्याच्या आधारे त्यांनी उघडपणे जनतेच्या पैश्यांची लयलूट चालवली आहे. सामान्य माणसाचे यांमध्ये खूप हाल होत आहेत. सरकार ओरडून सांगते की जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल, मात्र टोलनाक्याच्या ह्या उदाहरणातून जनतेचे अहितच होइल, अशा योजना सरकार राबवतांना दिसत आहे. बाजारात पोटासाठी लागणाऱ्या दहा रुपयाच्या पालेभाज्याचा भाव करणारा सर्वसामान्य माणूस आज टोलनाक्यावर तीस ते चाळीस रुपये खर्च करतोय याचा विचार तरी राजकारणाच्या 'राजा'ने  केला आहे का? निवडणूक आली की जनतेकडून मतांची भिक मागायची अन नंतर त्यांच्याच पैशाची लूट करायची अशी राजकारण्यांची आता मनोवृत्ती बनत चालली आहे. त्याच्या दृष्टीने जिथे "अर्थ " आहे आज त्याच कामांना अर्थ येत चालला आहे. थोडक्यात टोलनाक्याच्या या प्रश्नावरील अर्थकारण बाजूला ठेवून समाजहितासाठी सरकारने आता काहीतरी पाऊल उचलने  गरजेचे आहे.
                                                                                                      -   शुभम तेलभाते

दुष्काळामध्ये ‘दादाचा’ पाउस

                                                दुष्काळामध्ये ‘दादाचा’ पाउस

सध्या महाराष्ट्राच्या राज्याव्यावास्थेमध्ये कोणत्या घडमुडी चालू आहे याची कल्पना राज्यातल्या संपूर्ण मतदारांना माहित असणे अपेक्षितच आहे.महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावर बसणारा दादा जर मतदारांसमोर आज कट्यावरची भाषा वापरून माफी मागतोय तर उद्या संपूर्ण महाराष्ट्राचाच कट्टा झाल्यानंतर ची माफी अपेक्षित ठरेल का? हे एक प्रश्नचिन्हाच आहे.
महाराष्ट्राच्या राज्याव्यवस्थेची ची अवस्था ही लाथ मारून पाया पडण्यासारखी झालीये का? असा मला भासच दादाच्या दादागिरीच्या वक्तव्यानंतर कायमच होत आहे. आधी वाट्टेल ते बोलायचं आणि मग दिलगिरी व्यक्त करायची यामध्ये कोणता अर्थ मतदारांनी घ्यायला पाहिजे?. ज्या व्यक्तीला स्वतःच्या बोलण्यावर ताबा नाही तो राज्याचीव्यवस्था दुर्व्यवस्थेत बदलेल का याची काळजी सामान्यमाणसाकडून साहजिकच आहे. एका सामान्यव्यक्तीकडून राज्याबाद्दल्ची एवढी काळजी कदाचित दादा ला अनपेक्षित असेल कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याकडूनच दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अशा वक्तव्याचा पाऊस पडेल हे सुद्धा आम्हाला अनपेक्षितच होत.एवढंच नव्हेतर दादाच्या वक्तव्याच्या पाऊसाने त्यांच्या काकांना सुद्धा ओलेचिंब केले त्यावर काकाने पुतण्याच्या वतीने पाऊसमध्ये भिजणाऱ्या मंडळीची माफी मागितली. त्यंच्या ह्या काका आणि पुतण्याच्या सारावासाराविमुळे मला “ कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” हे गाण आठवलं पण या गाण्यासारखी अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची होईल का? असा प्रश्न माझ्यामनातत भिजत आहे...
                                                                   
                                                                   -शुभम तेलभाते
                                                                                                                          itsshubhtelbhate@gmail.com