Wednesday 19 July 2017

लढा सामान्यांचा

३ -४ दिवसापूर्वी सामाजिक संकेतस्थळावर एक चलचित्र पाहायला मिळालं..
आरजे मालिशका नावाच्या महिलेने मुंबईची दुरव्यवस्था एका चालचित्राद्वारे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला..
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर त्यात चुकीचं मला काहीच वाटलं नाही..
पण शिवसेनेची नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना ते गाणं मनाला लागलाय अस वर्तमान पत्र आणि टेलिव्हिजन चॅनेल वरून दिसलं..
त्याच गाण्याला विरोध म्हणून किशोरी पेडणेकर यांनी समाज कार्यातून वेळ काढून त्यांनी एक गाणं लिहल..
पण  मालिशका यांचं गाणं जास्तच मनाला लागल्या कारणाने मुंबई महानगर पालिकेने आरजे मालिशका च्या विरोधात मुबई महानगरपालिकेची बदनामी केली या कारणाने अब्रू नुकसणीचा दावा ठोकणार अस सांगितलंय..

म्हणजे सामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वतंत्र नाहीये का..?
आणि खरच जर समस्या असतील तर मतदारांनी बोलण्यात काय चुकीचं आहे..?

किशोरी पेडणेकर यांना गाणं लिहण्यासाठी वेळ मिळतो पण ज्या मतदारांनी मत दिली त्याच्या समस्या च काय..?
जर किशोरी पेडणेकर त्यांची कामे जबाबदारीपूर्वक काम करत असतील तर सरळ त्यांनी त्या चालचित्रा कडे दुर्लक्ष करावं..

सामान्य माणसाला जर स्वतःच मत मांडण्याचा जर अधिकार नसेल तर लोकशाहीच्या नावाखाली ही हुकूमशाही नाहीये का..??

पण समाजाची काम सोडून तुम्ही प्रतिउत्तर देण्यासाठी परत गाणं तयार करता..
आणि मुळात तुम्ही जर खरचं सामन्यासाठी प्रामाणिकपणे लढत असाल तर मालिशकाने तयार केलेल्या चालचित्रा मुळे तुम्हाला फरक च नाही पडायला हवा...

आणि संविधानाने दिलेला अधिकार जर तुम्ही सामान्य जनते कडून हिरावुन घेत असाल तर मला अस वाटत आपला देश हुकूमशाही कडे वळतोय..

आणि मालिशका आणि त्यांच्या सहाय्यकांना ते चालचित्र का तयार कराव लागलं ..?? ह्या प्रश्नातच किशोरीजींना त्यांचं उत्तर मिळेल अस मला वाटत..

धन्यवाद..!!

शुभम तेलभाते
itsshubhtelbhate@gmail.com

No comments:

Post a Comment