“अच्छे दिन” वाला देश
शीर्षक थोडं बोचक जरी वाटत असेल तरी हा लेख थोडा खोचक (काही समर्थकांना) होणार आहे असा विचार करूनच मी कलम ने कागद रंगवतोय…
देशात चालू असलेल्या घडमोडीचे अनुसरण करणारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनेल यांच्यावर विश्वास ठेवणं हे जंगलातल्या उपाशी सिंहाला आणि वाघाला पाळण्यासारखं झालंय.
राज्य सरकार (विशिष्ट महाराष्ट्र ) असो किंवा केंद्र सरकार यांनी दिलेली आश्वासन खरंच पूर्ण झाली आहेत का आणि केलेली काम किती खरी आहे ह्याचा शोध कोणत्यातरी पत्रकाराने घेतला असावा असं नाही दिसून येत, बहुदा “शोध पत्रकारिता” हा विषयच पत्रकारांच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडला असावा..
ज्या गुजरातच्या पंतप्रधानांनी (रहिवासी गुजरातचे असलेले) निवडून येण्यासाठी सोशल मेडिया चा पुरेपूर वापर केला त्याच पंतप्रधानांना आज सोशल मेडिया द्वारे त्याच्या चुका लोकांपर्यंत पोहचतील याची भीती वाटत आहे.
पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर २०१६ साली नोटबंदी ह्या विषयाची परीक्षा दिली, त्या परीक्षेचा चा निकाल आज वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळाला, खरंतर हा निकाल माजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांनी पेपर लिहण्याचा आधीच दिला होता पण बहुदा पंतप्रधानांना अभ्यास नसलेल्या विषयाचा पेपर देण्यात अति रस असेल, असो पण आता मला असा प्रश्न पडलाय कि २०१९ च्या परीक्षेमध्ये पंतप्रधान उत्तीर्ण होतील का …? आणि जर उत्तीर्ण व्हायच असेल तर मात्र EVM ह्या विषयाचा दिवस रात्र अभ्यास करावा लागेल..
२०१४ च्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानांनी विजयी होण्यासाठी खूप बाजारहाट केला पण हाच बाजारहाट त्यांच्या अंगाशी येणार असं दिसतंय आता विरोधक पंतप्रधानांच्या अपयशाचंच बाजारहाट मांडणार असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय.
याआधीचं सरकार भ्रष्टाचारी होतं आणि आहेच पण आत्ताच्या सरकारकरणे देश आणि लोकशाही विकयाला काढली कि काय असं मला सुप्रीम कोर्टाच्या न्यायदेवतांच्या पत्रकार परिषदेनंतर वाटत आहे. ह्या क्षणी अटलजींचे हे वाक्य “पार्टीया आयेंगी,जायेंगी सरकारे बनेगी बिगडेंगी,मगर ये देश रेहना चाहिये ये लोकतंत्र रेहाना चाहिये “ पूर्णपणे विरोधाभास वाटत आहेत
ह्या लेखाचा शेवट गोड जरी होत नसेल तरी आंबटच योग्य म्हणून आगामी निवडणुकांसाठी पंतप्रधानांना खूप खूप शुभेच्छा आपण EVM, जातपात,धर्म,वर्तमानपत्र आणि इतर माध्यमांचा चांगला अभ्यास करावा आणि येणाऱ्या २०१९ च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
शुभम तेलभाते.
itsshubhtelbhate@gmail.com